फायली गं फायली

Started by विक्रांत, February 02, 2016, 07:12:55 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

फायली गं फायली
सांग काय करशी
नस्ति होशी का
सहीसाठी जाशी

कधी तुझ्या डोईवर
महत्वाचा ठपका 
कधी गोपनीय तू
सगळ्यांना धसका

कधी फिरे इथेतिथे
छोट्या चुकासाठी
कधी कुणी टोलवी
काम टाळण्यासाठी

कधी असे तुझ्यावर
नको तोच शेरा
कुणामागे लागे मग
नको तोच फेरा

रोज एक जन्म
नव्या करामातीला 
नवा सूर्य उगवतो
ओझे वाढवायला

आवरणात तुझ्या
काय काय लपे
कुणी होई भणंग
कुणी नोटा छापे

कुणाचे करार तर
कुणाची तक्रार
सांभाळशी गुपचूप
तू बिलांचे प्रकार

सभोवती शुभ्र असे   
फाईलींचा  गराडा
कुणा  शोधू कुठे 
डोक्यामध्ये राडा

सवे माझ्या रोज 
काही येती घरी
नच संपणारी
असे खातेदारी

बायको म्हणे सवत   
पोरे पांढरी म्हातारी
सवे तिच्या चढे पण
नशा काही न्यारी

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in