सुंदरी

Started by Dnyaneshwar Musale, February 02, 2016, 07:29:53 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale


रस्त्यावरून जाताना दिसली मला एक
गोऱ्या गोऱ्या चेहऱ्याने हृदयाला दिला होता ब्रेक
नाकातली नथनी ,कानाचा झुणका
गोरे गोरे गाल पायाची चाल
देत होती माझ्या काळजाला दणका .

हळु हळु आला प्रेमाला पुर
भरून येई प्रेमात दोघांचा ऊर
पण अशी अचानक का गेली तु दुर
दोघांच्या प्रेमाचा तु केला होता कलम
मग जाताना लावुन नाही गेली त्यावर  मलम .

आनंदाने बोलायची प्रेमाचं घरटं
आता नाही मोडणार
डोळ्यातल्या डोळ्यात आता मात्र
मी एकटाच रडणार.

आयुष्यभर करील तुझ्यावरच प्रेम
मात्र तु केलीस माझ्यावर उलटी गेम
तुला माझ्यासारखे मिळतीलही खुप
पण माझ्या डोळ्यात असेल तुझचं रूप.