कधितरी!!!

Started by श्री. प्रकाश साळवी, February 02, 2016, 09:08:17 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

कधीतरी !!
वाटेल खंत तुला मी नसल्याची कधीतरी !
बोचतील काटे घेता सुखाची झोप कधीतरी !
चाळताना पूर्वायुष्य गुलाबी पानांचे
सापडेल गुलाबाची पाकळी कधीतरी!
जरी गाठले शिखर आयुष्याचे तरीही,
जाणवेल कमी माझी तुला कधीतरी !
असशिल सुखाच्या नशेत तरळताना,
होशील अस्वस्थ आठवणीनी माझ्या कधीतरी !
ओघळशील दोन आसवे आठवांची आपुल्या,
हाय! घायाळ होशील मनाने तू कधीतरी !
माळताना गजरा केसात तव करांनी,
गळेल एक फुल माझ्या आठवणींचे कधीतरी !
श्री.प्रकाश साळवी.

BHALGAT AKSHAY