माझे गाव

Started by Mayur Dhobale, February 03, 2016, 09:06:25 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

हे धावपळीच जगणं भकास वाटू लागलय, काळजा आत वसलेल्या गावाची ओढ सतावतेय....आणि पुन्हा पुन्हा ओठांवर माझी जुनी कविता 'गाव' नव्याने फुलतेय....

* जावे गावाला *

वाटतं कधी मनाला ...
जावं गावाला,जावं गावाला..
निजावे थंड झाडाच्या छायेत...
असू दे जगाला ,
ऊन्हाच्या मायेत...
भिनभिनणारया वारयाला ,
हलकेच अंगावर घेत...
करु कविता , गाऊ गित..
अन् लुटूया सुख हरएक क्षणाला ...
वाटतं कधी मनाला ...
जावं गावाला, जावं गावाला...

नको ती धगधग ,
नको ती पळपळ...
हवीय जगायला शांती...
नको तो पैसा ,
नको ते ऐश्वर्य ...
हवय जगण्यात स्थैर्य ...
हवाय प्रेमाचा एकच घास,
थकलेल्या या जिवाला ...
वाटतं कधी मनाला ...
जावं गावाला,जावं गावाला...

शेणाचा येऊ दे वास...
पण जिवाला नाही ञास.
हो, कष्ट करावे लागतील भारी...
तरी मजेत करतो ,
पंढरीची वारी....
अहो माऊलीची साथ,
आम्हा गावकरी जनाला...
वाटतं कधी मनाला ...
जावं गावाला,जावं गावाला...

प्रेम वाटू गावात ...
शून्य शून्य भावात.
एकीने जगू, एकीने मरु,
एकात एक अडकुनी...
माणुसकीचा झेंडा,
ऊंच ऊंच फडकुनी...
धुंद होऊन जाऊ...
मुक्तपणे जिवनाचे गीत गाऊ....
बघुनी हे सगळं ,
जळफळाट होईल घनाला...
वाटतं कधी मनाला ...
जावं गावाला,जावं गावाला....

जाईल रोज मळ्यात ...
कष्टाचे ताईज गळ्यात .
ओढेल यशाचा नांगर ,
कसूनीया प्रयत्नांचे कंबर..
अन्  पिकविल माझ्या देशाला...

वाटतं कधी मनाला ,
जावं गावाला ,जावं गावाला.....


                  -  मयुर ढोबळे  (https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/)