न जाणे

Started by पल्लवी कुंभार, February 05, 2016, 10:43:17 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

न जाणे
कसा भेटलास तू, कधी जाणले मी
कशी गुंतले मी, कशाने व्यक्त झाले मी
न जाणे
असेल तो सल वा जिद्द
किंवा गहिरा विचार
न जाणे
घेऊन कवेत ते धगधगते अग्निदिव्य
पेटतील का मशाली स्वप्नपूर्ती इच्छांच्या
न जाणे
आल्या त्या क्षणांचा भेटल्या त्या प्रसंगांचा
माळेन मी तो गजरा  सुगंधी अनुभवांचा
न जाणे
किती पुसतील तुला भुकेलेले हात
होशील का तू घास त्यांच्या कर्माने
न जाणे
सभोवती असेल किलबिलाट वा गलबलाट
ऐकलीस का ती एक आर्त हाक
न जाणे
दिसतील किती ते लाचारी वा अहंकारी
हतबल, अधाशी चेहरे या भूतलावर
न जाणे
किती असतील तुझे सतावणारे, छेडणारे
कधी नखरेल, खट्याळ तर कधी गुदगुल्या करणारे विचार
न जाणे
चिंतांच्या या गर्तेत, स्वप्नांच्या या चक्रव्युहात
पडतील किती प्रश्न तुला
न जाणे
आशेच्या त्या किरणात हसतील सारी सुखे
घेतील भरारी त्या उदात्त इच्छा, क्षितिजाकडे
चातकाप्रमाणे

~पल्लवी कुंभार