शाळा

Started by rshinde, February 05, 2016, 05:27:40 PM

Previous topic - Next topic

rshinde

मनाचं मनाशी जुळलं म्हणजे झालं
संवाद खूप नसले तरी तिने समजलं म्हणजे झालं
शाळा ~ कॉलेज केले , बहुतेक झालाय माझं शिक्षण
सार काही लक्षात नाही राहिली फक्त तिची आठवण
मैदानाच्या गर्दीमध्ये पहिल्यांदा ती बघितलेली
जणू बागेतल्या फुलांमध्ये कळी नसे उमललेली
गुलाबाच्या फुलासारखा असे तिचा हाव ~ भाव
पण काट्यासारखं तिखट तोचनारा सरळ तिचा स्वभाव
दिवसा मागे दिवस सरले चटक मणी प्रेमाची
पण एकवटले नाही बळ बोलण्या "होशील का तू माझी ?

कवी- राहुल शिंदे