संधीकालच्या निरव वेळी

Started by sameer3971, February 05, 2016, 06:09:56 PM

Previous topic - Next topic

sameer3971

लांब झाल्या सावल्या
किलबिल शांत झाली
आर्त झाले शब्द माझे
संधीकालच्या निरव वेळी

आयुष्य सारे वेचिले
फक्त ऐहीक सुखा साठी
थीजून माझे अंग गेले
संधीकालच्या निरव वेळी

उरल्या सार् या आठवणी
उरले फक्त घरटे
लेकुरे सारी उडून गेली
संधीकालच्या निरव वेळी

आस आहे पुर्वेची
फीरुन सारे येतील सगळी
आज मात्र.........
आसवे सारी सूकुन गेली
संधीकालच्या निरव वेळी