एक सकाळ उजेडाची..!

Started by Rajesh khakre, February 05, 2016, 09:17:24 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

जगायचं तोवर जगू ताठ मानेनं
प्रयत्न करु अंतिम श्वासापर्यन्त
जगु खुमारीन मनसोक्त अगदी
हासु असतील अथवा आसुही
खळखळू देऊ ओठावर-गालावर
सांगू संकटें आणि दुःखालाही
तु ये खुशाल माझी मना नाही
पण एक मोकळा श्वास घेऊदे
तोच देईल मला लढायला बळं
मी घाबरत नाही तुला आणि
तुझा तिरस्कार ही नाही करत
ते माझ्या स्वभावातच नाही बसत
कारण गर्द अंधार्या रात्रिपल्याड
मला दिसते एक सकाळ उजेडाची
तो उजेड नाही थांबवू शकत कुणी
अगदी तू असला किंवा मी ही
इथला भास्कर कधी उशिरा उगत नाही
अन् त्याची किरणे कुणी अडवू शकत नाही
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(माझ्या कविता इमेज फॉरमॅट मध्ये मिळवण्यासाठी whatsapp विनंती पाठवा)