तरंग

Started by पल्लवी कुंभार, February 08, 2016, 10:33:13 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

होता निवांत क्षण
राजा राणीच्या संसाराची
सरली चाळीस वर्ष
तसा पिंपळही झाला जीर्ण
आली हळूच झुळूक
त्याची उंचावता भुवई
मनी रेंगाळला प्रश्न
कशी गेली इतकाच भाव
ज्यास होते दोन अर्थ
झुळूक की वर्ष ?
जाणूनी मनीचा हर्ष
मिसळले नयनात नयन
होता संध्यासमय
नदीतही उमटले तरंग
पसरली अंबरी लाली
सुखात गेली
उत्तरली गार्गीपरी पटराणी
क्षणात मिसळली
ही लाली तरंगात...

~ पल्लवी कुंभार