घुसमट

Started by madhura, February 09, 2016, 12:18:35 PM

Previous topic - Next topic

madhura


घुसमट
वाटलं होतं त्याने माझी
अंतरीची हाक़ ऐकावी
माझ्या मनाची घुसमट
थोड़ी कमी करावी
प्रत्येक वेळी का ..
चातकानेच वाट पहावी?
वरुण राजनेही जरा
आपुलकी दाखवावी...
एका थेम्बाने जर....
तृप्त होत असेल चातक
वरुण राजनेही मग त्याला
समजावा याचक ....

मंजू हाडके
(९/२/२०१६)