अशी सांज ही वाटेवरती

Started by madhura, February 09, 2016, 12:19:22 PM

Previous topic - Next topic

madhura


अशी सांज ही वाटेवरती
मनी धुंद ती तुझी बासुरी
तुझे सावळे रूप भुलवते
संध्याछाया पुन्हा लाजरी
तिला न कळते वळते काही
उगा शोधिते कुणा बावरी
उमजून येते जरा उशिरा
तू तर असशी तिच्या अंतरी


भावतालाची अंधुक सीमा
सांज पसरता क्षितीजकिनारी
युगयुगाचे मिलन जणू ते
तिथेच राधा शाम मुरारी


By Vaishali Shembekar Modak

subodh sawant

वा वा इतकी छाण कविता ते ही आमच्या श्री कृष्णा वर मस्त....