काळजावर केवढे या वार झाले

Started by madhura, February 09, 2016, 12:20:03 PM

Previous topic - Next topic

madhura


काळजावर केवढे या वार झाले
हृदय जखमांचे जसे आगार झाले
बोल काही तू नव्याने आपल्यावर
या जुन्या गोष्टी चघळणे फार झाले
राहिला ना पावसाळा ना उन्हाळा
या ऋतूंना कोणते आजार झाले ?
बांधल्या भिंती कुणी घरट्यात बाळा
बाप आई पण तुझे शेजार झाले
फास्ट लोकलसारखे झालंय जगणे
केवढे आयुष्य हे बेजार झाले
वा पुन्हा अच्छे दिवस आले प्रजेचे
नाचण्याचे परत सुरु बार झाले
पारडे हल्ली व्यथांचे का झुकावे ?
भावनांचे स्वस्त हे बाजार झाले l
लागले हे जग मलाही ओळखाया
केवढे गझले तुझे उपकार झाले
युद्ध प्रेमाने सहज हे जिंकलो मी
सर्व वैरी आज माझे यार झाले
...सुनिल खांडेकर ....