दुष्ट प्लान

Started by vbhutkar, February 11, 2016, 06:48:51 AM

Previous topic - Next topic

vbhutkar

माझा एक दुष्ट प्लान आहे
बऱ्याच दिवसांचा...

तू मित्रांसोबत टपरीवर असताना
अचानक टपकायचा
मला पाहून सगळे हसायचे थांबले
की फालतू जोक सांगायचा.

तू मिटींगमध्ये असताना
सारखे फोन करायचा
तू फोन उचललास की
वेगळंच काहीतरी बडबडायचा.

तुझ्या ऑफिसमध्ये एकदा
मोठ्ठ गिफ्ट पाठवायचा
फुलांसोबत लाल 'हार्टही'
तुझ्या माझ्या नावाचा.

तुझ्यासोबत ट्रीपला येताना
तोकडे कपडे घालायचा
'उगाच आणलं हीला'
असं वाटायला लावायचा.

तुझ्या दादा-वहिनीसमोर
तुझा हात धरायचा
त्यांनी पाहिल्यावर
त्यांच्याकडेच तुझी तक्रार करायचा.

कसा आहे प्लान
तुला त्रास द्यायचा?
सांगतोस घरी की
मीच नंबर लावायचा?
विद्या भुतकर.

माझे फेसबुक पेज:
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/