प्रेम नावाची कविता

Started by PradipD, February 11, 2016, 04:09:18 PM

Previous topic - Next topic

PradipD

थोडे  शब्द  पाहिजे, थोडा एकांत पाहिजे
थोडी सुरेल साधी नविन, एक चाल पाहिजे
डोक्यात आणि हृदयात सतत भिरभिरणाऱ्या
माझ्या " प्रेम " नावाच्या कवितेसाठी.

थोडा सूर्यास्त पाहिजे, सागर किनारा पाहिजे
हातात तिचा हात पाहिजे, दोन गुलाबी ओठ पाहिजे
स्वप्नातच झुरणाऱ्या, नन्तर विरणाऱ्या
माझ्या " प्रेम " नावाच्या कवितेसाठी.

थोडे आयुष्य पाहिजे, तिचा सहवास पाहिजे
थोडे लाजणे थोडे हसणे, शृंगाराचे सारे रंग पाहिजे 
असंख्य भावनांनी, अबोल होणाऱ्या
माझ्या " प्रेम " नावाच्या कवितेसाठी.

थोडा विरोध पाहिजे, थोडा विद्रोह पाहिजे
जातीची भिंत पाहिजे, विरहाची खंत पाहिजे
हजारो प्रेमवीरांचे, अश्रू  समजणाऱ्या   
माझ्या " प्रेम " नावाच्या कवितेसाठी.

-प्रदिप ( नाशिक )

Yogesh p

 Pradip ha marathichya pratibhavant navkavinpaiki ek ahe. Tyachya itar kavitanpramanech hi kavitahi apratim ahe.
Tyachya bhavi kavitansathi shubhechcha! (Y)