अजूनही धुके दाटलेले

Started by पल्लवी कुंभार, February 11, 2016, 08:34:36 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

अजूनही धुके दाटलेले
गुलाब पाकळ्यापरी
ओठ रंगलले

अजूनही धुके दाटलेले
दोलायमान कटीसह
हाती कंगण किणकीणे

अजूनही धुके दाटलेले
दरवळे सुवासी मोगरा
माझे रणरण रोमांचलेले

अजूनही धुके दाटलेले
झुलता रेशमी रुमाल
अत्तरी गंध दरवळे

अजूनही धुके दाटलेले
पैजणांच्या रुणझुणत्या नादांसवे
तिचे शृंगारी रूप नटलेले

अजूनही धुके दाटलेले
तिच्या एका कटाक्षासाठी
अंतरंगात काहूर माजलेले

अजूनही धुके दाटलेले
तिच्या एका होकाराने
माझे जग वेडावले

शिंपल्यातील मोत्यापरी
पानावरी दवबिंदू ओथंबलेले

~पल्लवी कुंभार