राहून गेलं..

Started by vbhutkar, February 12, 2016, 12:24:51 AM

Previous topic - Next topic

vbhutkar

आज सकाळी अलार्म चुकला,
आणि घाईघाईत उठताना,
झोपलेल्या तुझ्याकडे प्रेमाने पहात
'गुड मोर्निग' म्हणायचं राहून गेलं..

पोरांचे डबे बनवताना,
'बाय' म्हणत तू निघताना,
दारात येऊन तुझ्याकडे पहात
'बाय' म्हणायचं राहून गेलं..

दुपारी ऑफिसमध्ये जेवताना,
तू ठेवलेलं सफरचंद खाऊन
फोनवर बोलताना
'थ्यांकू' म्हणायचं राहून गेलं..

संध्याकाळी कंटाळून आल्यावर,
वैतागून सोफ्यावर बसताना
तू आवरलेलं घर पाहून
'छान' म्हणायचं राहून गेलं..

व्हॉटस एप वर मैत्रिणीशी बोलताना,
बाकीचे जोक वाचताना,
शेजारी बसलेल्या तुझा
हातात हात घ्यायचं राहून गेलं..

कधीतरी पिक्चर बघताना,
प्रेमाची मोठी स्वप्नं बघताना,
छोट्या छोट्या गोष्टीतून
प्रेम दाखवायचं राहून गेलं ..

विद्या भुतकर .
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/