प्रवास

Started by smadye, February 12, 2016, 03:36:27 PM

Previous topic - Next topic

smadye

प्रवास

माझा असा एक प्रवास
तेथे स्वताचा स्वताशी सहवास
माझे माझ्याशी बोलणे
क्षणात झुरणे क्षणात गुदगुल्या होणे

अशावेळी मी असतो फक्त माझा
इतर कोणाचा सहवास वाटे नकोसा
करितो मी माझ्या गुणांची वजाबाकी
शोधितो मी कुठे आहे का थकबाकी

विचारांचा माझ्या आहे गलबला
जीवनातल्या उणिवांची जाणीव मला
पुढे काय करावे याचे करीत चिंतन
माझ्यातील गुणदोषांचे मी करितो मंथन

माझा हा प्रवास माझा मित्र
पुढील आयुष्याचे दावेल सूत्र
वाट चालताना नवीन वाट गवसावी
येणाऱ्या क्षणाची कोडी सुटावी

                       सौ सुप्रिया समीर मडये