माझी प्रदन्या...

Started by Ankush S. Navghare, Palghar, February 13, 2016, 10:03:34 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

स्वप्नांत रमणारी
दुःखात हसणारी
मायेची सावली
माझी प्रदन्या...

मित्रांत असणारी
मैत्रित झुरणारी
मैत्रीची पारखी
माझी प्रदन्या...

सतत कष्टनारि
सर्वांच करणारी
पपांची लाडकी
माझी प्रदन्या...

मुलींची मशाल
मुलांना मिसाल
सर्वांचा आधार
माझी प्रदन्या...

प्रेमाची भूकी
भावाची राखी
आवडती सखी
माझी प्रदन्या
माझी प्रदन्या...
... अंकुश नवघरे

दी. १३.०१.२०१६
वेळ. १०.११ सकाळी...
(टिप. ही कविता एका बेस्ट फ्रेंड ला समर्पित आहे म्हणून नाव लिहिले आहे.
नावात साम्यता आढळल्यास क्षमस्व...)

sandip gavale