Valentine day special

Started by Minakshi Pawar, February 13, 2016, 10:35:52 AM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

                 ❤ प्रेमाची व्याख्या ❤

                  14 फेब्रुवारी "valentine day" जगभर हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो. यालाच मराठीत आपण ' प्रेम दिवस ' असं गोड नाव देऊ शकतो. "प्रेम"...... किती  गोड आहे न हा शब्द! प्रत्येक व्यक्तीला हवाहवा सा वाटणारा असा हा शब्द आहे. आणि विशेषतः तरुण वयात तर या प्रेमाचे एक वेगळेच आकर्षण असते..... तुम्ही जर कोणाला विचारलं कि प्रेम म्हणजे काय ? तर प्रत्येकाची प्रेमा बद्दलची व्याख्या वेगळी आहे असे आपल्याला दिसेल. पण मग प्रेम म्हणजे नक्की काय हो?
                आई आपल्या मुलांवर करते ते प्रेम? मिञ आपल्या मिञावर करते ते प्रेम ? कि प्रेयसी तिच्या प्रियकरा वर करते ते प्रेम ? प्रेम हे प्रत्येक नात्यात दडलेले असते.... पण प्रत्येक नात्यातील प्रेम हे वेगळे असते आईने आपल्या बाळा वर केलेले प्रेम आणि प्रेयसी चे प्रियकरा वरचे प्रेम ह्या दोन प्रेमा मध्ये खूप तफावत आहे. ह्या प्रेमाची पण एक तफावत आहे....... ती म्हणजे अशी की ते माणसाला आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगते, जगायला शिकवते. मिञ प्रेम , निसर्ग प्रेम , नाते संबंध , ही पूर्ण सृष्टी प्रेमावर आधारलेली आहे. विचार करा जरं ह्या जगात प्रेमचं नसतं तर? बापरे......... किती भयानक कल्पना आहे ही!
                 पण आत्ताच्या ह्या आधुनिक युगात प्रेम म्हणजे काय हे कोणाला कळतच नाही. मुलगा मुलगी दोन दिवस facebook वर बोलले कि झाल त्यांच प्रेम. मुलाने मुलीला gifts दिले, drive  लि नेलं कि झालं प्रेम. पण हे प्रेम खरं आहे का? अस प्रेम असत का? हे फक्त आकर्षण आहे. आणि त्यालाच हे वेडे लोक प्रेम समजतात...... आणि कमी वयात आयुष्य उदध्वस्त करुन टाकणार्या चुका करतात. अर्थात मला असं म्हणायचं नाही आहे कि तुम्ही प्रेमचं करू नका....... पण खरं प्रेम करा. तुमच्या प्रेमाला समाजात मान मिळवून द्या. त्याच्या / तिच्या अब्रूच्या धिंडवड्या काढू नका.निस्वार्थ प्रेम करा. प्रेमाचा अर्थ आहे त्याग. तेजाब टाकून असे घाणेरडे कृत्य करून प्रेमाला बदनामी देऊ नका.
                  कारण प्रेम करणं खूप सोप्प आहे पण...... ते निभावून न्यायला आयुष्य कमी पडते. कारण प्रेम खूप नाजुक संकल्पना आहे. प्रत्येकाने आयुष्यात खरं प्रेम केलं पाहिजे...... आणि मग बघा जग किती सुंदर होईल. कारण प्रेमात खूप ताकद आहे. असे म्हणतात कि ' प्रेमाने पूर्ण जग जिंकता येते '. आणि खरचं प्रेमात खुप ताकद आहे...... नाहीतर आपण सोबत राहूच शकलो नसतो. प्रेमा मुळेच आपली आणि समाजाची बांधिलकी टिकून आहे. फक्त आधुनिक काळातील प्रेमाची व्याख्या बदलावी असे वाटते . प्रेम करा पण लाज वाटेल असे घाणेरडे कृत्य करू नका! आणि ते करण्यासाठी पाश्चात्त्य संस्कृती तील valentine day साजरा करण्या पेक्षा आपल्या संस्कृतीत ' प्रेम दिवस ' साजरा करा.......
        प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  आधुनिक  काळातील पण जुन्या विचारांची तरुणी.......
                  कु. अंजली मोहनराव पवार
              pawaranjali416@gmail.com
                              amravati
                   

yallappa.kokane

वाह अंजली जी खुप छान. हे वाचून मला माझी कविता आठवली.

प्रेम म्हणजे नक्की काय?

आजही तुझी आठवण येते
काळ जरी लोटला भरपूर।।
आहेस सातासमुद्रा पलीकडे तु
नेहमी लागे जीवा हुरहुर।।१।।

तुझ्या माझ्या नात्याचं गणित
आजही सुटत नाही मला।।
एकांत असतो जेव्हा सोबत
आठवणीत रमतो घेऊन तुला।।२।।

होईल का भेट आपली?
देशील का प्रेमाचा पूरावा?
जमलं तर कमी कर
दोघांमधील वाढलेला दूरावा।।३।।

माहित आहे चांगलच मला
तुलाही येते माझी आठवण।।
गुंतलेले मन तुझ्यात माझे
करीत असते आठवांची साठवण।।४।।

मनी येती आठवणी दाटून
मिळता जरासा एकांत मनाला।।
प्रेम म्हणजे नक्की काय?
हाच प्रश्न विचारतो स्वतःला।।५।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० फेब्रुवारी २०१६

९८९२५६७२६४
yallappa.kokane@yahoo.in

http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t22562/

यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर