*** माझी व्हॅलेंटाईन ***

Started by धनराज होवाळ, February 14, 2016, 12:35:53 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


👸👸 माझी व्हॅलेंटाइन 👸👸🏼

काय लिहावं कळत नाहीये,
नुसताच वेड्यासारखा हसतोय..
नाही म्हंटलं तरी परत परत,
सखे मी तुझ्याच प्रेमात फसतोय..!!

माहीत नव्हतं प्रेम म्हणजे काय,
तुझ्या सहवासात आल्यावर कळलं..
कधीकाळी एकटे असणारे हे हृदय,
कसं नकळत तुझ्या प्रेमात वळलं..!!

तु माझ्या जीवनात आली अन्,
आयुष्यच माझं बदलून गेलं..
जसं एका नाजुक पाकळीचं,
प्रेमफुल हलुवार फुलुन गेलं..!!

सखे तु जीवनात आलीस अन्,
मी वेड्यासारखा वागू लागलो..
येशु, अल्लाह अन् देवाला,
मी फक्त तुलाच मागु लागलो..!!

प्रेम करतोय तुझ्यावर खुप,
जन्मोजन्मी पण अफाट करेल..
फक्त तुझ्यासाठीच जगेल,
अन् तुझ्या प्रेमासाठीच मरेल..!!

एकदा होकार तर देऊन बघ,
मी फक्त तुझाच होऊन जाईन...
पण एकदा सांग ना गं सखे,
होशील का तु माझी व्हॅलेंटाईन...???
-
स्वलिखित....
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
(धनराज होवाळ)
मो. ९९७०६७९९४९
❤❤❤❤❤❤❤❤