चौपाटीवरती

Started by Gorakhnath Borse, February 14, 2016, 10:14:58 AM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

           शीर्षक :चौपाटीवरती


अशाच एका चौपाटीवरती
तुझ्या न माझ्या झाल्या भेटी
त्या भेटीच्या सहवासातून
जडल्या तुझ्या भेटी गाठी

बोलत होते प्रेम मनाचे
काटे ज्यावर अनेक होते
प्रेमामध्ये नजर भिडता
मनामध्ये दु:ख होते

माझे दु:ख समजून तुम्ही
धीर दिला मजला तेव्हा
बोलू लागले पुठे पुठे मी
कळले नाही शब्द तेव्हा

असेच राहूदे प्रेम आपूले
को-या कागदाच्या शाहीमध्ये
जिवनाच्या या चौपाटीवर
आपण भेटू मध्ये मध्ये

     
          कवी ~ गोरखनाथ बोरसे लोणारी
                        पञकार मालेगांव
                        मो नं 8007980038
    अध्यक्ष :विश्वलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था