प्रेमदिवस

Started by श्री. प्रकाश साळवी, February 14, 2016, 12:33:07 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

प्रेमदिवस

मनातली अनामिक ओढ
तुझ्याकडे धाव घेते
अन् स्वस्थ बसु देत नाही
बेचैन माझं मन
तु कोण? कुठे आहेस?
काहीच माहीत नाही
पण! ओढला जातोय
तुझ्याकडे अनामिक पणे
हेच का ते "प्रेम"
तेही मला माहित नाही
(प्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा)

श्री.प्रकाश साळवी