त्या व्याकूळ संध्यासमयी

Started by pranavdesh1211, February 14, 2016, 02:05:04 PM

Previous topic - Next topic

pranavdesh1211

त्या व्याकूळ संध्यासमयी मन चिंतेत ग्रासले
भावनांनी जणू मनाला फास आवळले..
तुझे असे निघून जाने रुचले नाही कधी   
मला मीच समजावले कदाचित पुरला नाही अवधी..
भावबंध तुटल्यावर मनाला आवरावे कसे
तू जरी निघून गेलीस तरी आठवणींना रोखावे  कसे...
सोबतीच्या त्या वेळी जीवातजीव गुंतला
तू जरी माळ तोडली माझा गुंता वाढला..
अथांग आकाश नभांनी व्यापले जावे
मनावर तसे मळभ,नयनी माझ्या आसवे..
नदी काठच्या पिंपळाचा प्रश्न मला आज
माझ्यातला कुठे हरवला तुझा आवाज..


प्रणव देशपांडे
नाशिक