पुन्हा प्रेमात

Started by niteshk, February 14, 2016, 09:46:18 PM

Previous topic - Next topic

niteshk

...        पुन्हा प्रेमात        ...

अश्रू गळेपर्यंत सूर्याकडे बघत रहावसं वाटतंय
चिंब भिजलो पावसात तरी अजून भिजावसं वाटतंय
नदीच्या प्रचंड प्रवाहात उलटं पोहावसं वाटतंय
असलं काही नको ते धाडस करावसं वाटतंय
कारण आज मला पुन्हा प्रेमात पडावसं वाटतंय

सगळी बंधनं झुगारून मोकळं जगावसं वाटतंय
कल्पनांच्या लाटांवर स्वार होऊन रानोमाळ हिंडावसं वाटतंय
चांदण्या रात्री तासन् तास तारे मोजत बसावसं वाटतंय 
हे सगळं वेड्यासारखं करून बघावसं वाटतंय
कारण आज मला पुन्हा प्रेमात पडावसं वाटतंय

बालपणीच्या आठवणीत हरवून जावसं वाटतंय
लगोरी लपंडाव लंगडीच्या डावात रमावसं वाटतंय
शक्तीमान बनून गोल गोल फिरावसं वाटतंय
हसू येतंय पण हे सगळं पोरकट करावसं वाटतंय
कारण आज मला पुन्हा प्रेमात पडावसं वाटतंय

त्याच स्वर्गीय सौंदर्याकडे एकटक बघावसं वाटतंय
त्याच मधुर हास्यात स्वतःला विसरावसं वाटतंय
त्याच गहिऱ्या नजरेत पुन्हा कैद व्हावसं वाटतंय
त्याच प्रितीच्या खोल डोहात बुडावसं वाटतंय
कारण आज मला पुन्हा प्रेमात पडावसं वाटतंय

सावलीसारखं सतत तुझ्या सोबत रहावसं वाटतंय
तुझ्याभोवती फुलपाखरू बनून बागडावसं वाटतंय
आता फक्त तुलाच समजून घ्यावसं वाटतंय
तुझ्या सुखाचं कारण अन् दुःखाचं निवारण बनावसं वाटतंय
कारण आज मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावसं वाटतंय

स्वलिखित