मोकळी जागा

Started by dhanaji, February 15, 2016, 11:56:56 AM

Previous topic - Next topic

dhanaji


मोकळी जागा


माझ्या जगण्यात
तुझी जागा नक्कीच आहे
आणि ती पक्कीच आहे
तुझ्या जगण्यातली
माझी जागा
तूच रिकामी केलीस
मोकळी केलीस
आठवणी सकट
माझ्या शिवाय जगायला
तुला यायला लागले
...पण तरीही
जर कधी तुला वाटलेच
परत ती जागा मी भरावी
तर माझा अर्ज
तुझ्या मनातजपून ठेव
मी गेलेली वेळ परत
आणू शकतो
तुझ्या परवानगीने




By अजित परळकर