आयुष्य हे...

Started by gayatrikalikar, February 15, 2016, 12:06:41 PM

Previous topic - Next topic

gayatrikalikar

आयुष्य,
     कडीकुलूपात बंधिस्त केलेलं.
   सुखदुःखाच्या मर्यादेने बांधलेलं...
  यश वा किर्ती, प्रतिष्ठा वा संपन्नता,
     या म्रूगजळात फसलेलं....
आयुष्य,
   सतत धावत असणारं....
  अस्तित्वाला विसरून अशाश्वताला शोधणारं...
  सत्य वा असत्य, व्यथा वा दुःख,
   तथा सत्व हरवून बसणारं..,,...
आयुष्य,
   सुखाच्या विश्वात गुरफटलेलं...
  खोटया प्रसिद्धीने कोंडलेलं...
प्रेम वा नातं, माणूसकी वा संस्कार,
    सारे काही गमावलेलं....
आयुष्य,
   सुखाच्या लोभात गुंतणारं..
  समाजाच्या मर्यादेने झुकणारं...
गरज वा हव्यास, आशा वा महत्त्वाकांक्षा,
  या दोहोंमध्ये विभागणारं....
आयुष्य,
  दोन घडींचा डाव असणारं...
  पोकळ वास्तव्यात भरकटणारं...
प्रवाह वा संथ, सुरूवात वा अंत,
    शेवटी मातीत विरणारं..