वेड्या मना, शुन्य मी , विश्व ही शून्य आज !

Started by sangita_4101980, February 15, 2016, 12:52:43 PM

Previous topic - Next topic

sangita_4101980


* वेड्या मना, शुन्य मी , विश्व ही शून्य आज !


रिक्त भासे , हृदय आज ,
श्वासांचे जडत्व , जाणवे आज,
न संवेदना , न भावना ,न अश्रू आज ,
आठवणीच्या विरहात, ओथम्बले मन,
उदासीनतेच्या गर्तेत , हरवला क्षनेकक्षण,
स्वप्नाच्या राखेत , अस्तित्वाचे क्षालन ,
वेड्या मना, शुन्य मी , विश्व ही शून्य आज !


रिक्त रिक्त लोचन आज ,
प्रतिमा प्रेमाची भिजली अश्रूत आज,
न आशा , न चेतना, न हर्ष आज,
ओसंडलेल्या अश्रू पुरात वाहिले नयन ,
स्वप्नाच्या खारटपाण्यात अस्तित्वाचे क्षालन ,
वेड्या मना, शुन्य मी , विश्व ही शून्य आज !!

रिक्त भासे देह आज,
आत्माचे ओझे जाहले आज ,
न स्पर्श , न चेतना , न जाणीव आज ,
आठवांच्या विरहात स्फुन्दते मन ,
स्वप्नाच्या रजनीत, अस्तित्वाचे क्षालन ,
वेड्या मना, शुन्य मी , विश्व ही शून्य आज !!!

रिक्त रिक्त जीवन आज ,
मनोरथांचे भंगले स्वप्न आज,
न शपथ , न वचन , न आशा आज ,
प्रीतीच्या गीतात लोपले  कणअनकण,
स्वप्नाच्या  निश्वासात , अस्तित्वाचे क्षालन ,
वेड्या मना, शुन्य मी , विश्व ही शून्य आज !!!!

संगीता