ती

Started by पल्लवी कुंभार, February 15, 2016, 12:57:52 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

ती एक दिशा, वाट दाखवणारी
चोहीकडे आनंदाची, उधळण करणारी

ती एक किमया, पुनरुज्जीवनाची
करी स्पर्श ममतेचा, प्रतिमा वात्सल्याची

ती एक रणरागिणी, पसरणाऱ्या काळोखातली
फेकी अंगार तिमिरी, उज्ज्वल तेजोमयी

ती एक लकेर, हसऱ्या क्षणांची
अविरत झटणारी, कार्यशील चैतन्यमुर्ती

ती एक सखी, जणू शब्द अर्थांसाठी
प्रगतीच्या वाटेवर, साथ पराक्रमाला विवेकाची

ती एक लावण्यवती, मोहवणारी
साजे शृंगार तिला, जणू धरती पावसातली

ती एक अस्मिता, उगवत्या संवेदनांची
जणू अवंतिका, लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची

ती एक संहिता, मानवतेची
बहरे सुंदर गोफ, सर्जनशील विचारांनी

जगे स्वच्छंद, जपुनी अतूट नाती
घेई भरारी कांता, बांधुनी झुला विजेवरी

~ पल्लवी कुंभार