प्रेमस्वरूप

Started by madhura, February 15, 2016, 04:14:15 PM

Previous topic - Next topic

madhura


ती माझ्या सोबत प्रवासात
चापून चोपून साडी नेसलेली
केसांवर कुठे कुठे रुपेरी कलाबूत
आपला साडीचा पदर सावरत असलेली ....
मी सहज म्हटलं
" तुम्ही ड्रेस का घालत नाही ??
माझा साधाच प्रश्न ..
प्रवासात बर असत..
झोपेत उगाच पदर वैगरे
सावरण्याच झंझट नसत ....
तसं म्हणाली
मला नाही आवडत ज्यास्त
आणि माझी मुल म्हणायची
"आई आईसारखी दिसायला हवी !"
म्हणून मग नाही घालत ड्रेस ...
तिच्या "म्हणायची" या शब्दाने
काळीज चिरत गेलं
ती हसते ,बोलते , मी खुश राहते म्हणते
मधेच म्हणते आता कोणासाठी ठेऊ ?
छान जगून घेऊ !
सगळ जग म्हणत
"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी !"
देवा !कधी तीच आई लेकराविना कशी
राहील असा विचार केलास का रे ????
जीच्या पासून तू क्षणात हिरावून
घेतलेस सारे !!!!!
तीन आजही जपून ठेवलेय तिच्यातली
प्रेमस्वरूप वात्सल्यसिंधू आई !!!
तुला नाही वाटत ?
तिची वात्सल्याची झोळी
उध्वस्त करण्यात तू
खूपच केलीस घाई !!!!!!!!!!
सौ .ज्योत्स्ना राजपूत