==* केतकी फक्त तुझ्यासाठी *==

Started by SHASHIKANT SHANDILE, February 16, 2016, 11:48:54 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

प्राजक्ता नावाने बहरली
सप्तसुरांची राणी
केतकी जिचे नाव आनिक
रूपाने ती मस्तानी

ऐकुनी आवाज एकदा मन मोहुनी जाते
नाजुकसी जणू परी एखादी रूप सुंदराचे
नागपूरची कन्या आमचे नाव गाजविते 
होतो अभिमान जेव्हाही गोड ती गुणगुणते

काय करावे कौतुक मुलीचे
शब्दाने काय लिहावे
प्रेमरूपी हे आशीर्वाद सर्वांचे
गगन भेदून उंच उडावे
--------------**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!