अशी ही रात्र!!

Started by janki.das, February 17, 2016, 11:21:49 AM

Previous topic - Next topic

janki.das


अशी ही रात्र!!
रात्र का भासते आज विदिर्ण-ऊदास
स्पर्शाचे तुझ्या अजून ताजे आहेत भास
आहे तोच गंध केसातिल मोग-याचा,
तोच आहे कालचा श्वास अन् ऊच्छ्वास!
का कालचा चंद्रही होता अंधारलेला?
का ऊगा शोधतो मी कालच्या गंधास?
मिठी घट्ट झाली, चंद्र ढगाआड गेला
ऊधाण आले भरोनी प्रणयाराधनेस
होती रातराणि ही लाजली जराशी
गंध धुंद झाला होता तो राजहंस!
होता सूरही धरला तुझ्या काकणांनी
सुरमयी झाली होती कालची रात्र खास!!
श्री.प्रकाश साळवी