प्रीतफुला..

Started by janki.das, February 17, 2016, 11:23:02 AM

Previous topic - Next topic

janki.das


प्रीतफुला..
मखमली फुलांच्या वेलीने
मज कवेत सख्या घेतले
ओंजळीतल्या सुगंधी फुलांनी
न्हाऊ मज तू घातले
धुंद होऊनी तळयातले तुझे
प्रतिबिंब न्याहाळीत होते
स्पर्शाने तुझ्या तव लाजुन मी
कशी बावरुन गेले....
मखमली फुलांच्या वेलीपरि
तुझे बाहु भासत होते
श्वासातुन तुझ्या तव कर्णफुलावर
भाव उमटत होते....
नयनातूनी सख्या प्रीतीची नशा
बहु ओसंडत होती
तव लाजेने काया माझी
रोमांचित जाहली...


-- मंजू हाडके