मग का ? आपण सगळे Whats app वर मग्न आहे.

Started by Vaibhav.kul, February 17, 2016, 06:13:12 PM

Previous topic - Next topic

Vaibhav.kul

आज ची तरुण पिढी  Whats app वर मग्न आहे
आज गाव गाव्वांत लोढ शेडींग वाढत आहे ,
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी तुम्ही
काय केल असतं? राजे ! हा प्रश्न मनात आहे,
सरकार मात्र अरबी समुद्रात तुमचा पुतळा
बांधणार आहे,
आज ची तरुण पिढी Whats app वर मग्न आहे.

राजे ! तुमच्या स्वराज्याकडे दुर्लक्ष होत आहे
उस - कापसाचा पैसा world cup आणि IPL साठी आहे,
तेलगी - हर्षद मेहता कोणाला लक्षात नाही
आसाराम बापू व तेहलका यांच्या केसेस पेंडिंग आहे ,
आज ची तरुण पिढी Whats app वर मग्न आहे.

दाभोलकर, पणसेकर यांचे मारेकरी
अजूनही मोकाट फिरत आहे,
अभिनेता आणि अभिनेत्री ला एका शो
चे  करोडो रुपये दिले जात आहे,
नोकरी साठी फिरणारा मात्र उपाशिच आहे
आज ची तरुण पिढी Whats app वर मग्न आहे.

दोनदा जन्म घेतला का  राजे ! तुम्ही
तुमचे दोन वाढदिवस साजरे होत आहे,
पेट्रोल आणि डीझेल चे भाव वाढत च आहे,
ह्यात मात्र रयतेची च लूट आहे
आज ची तरुण पिढी Whats app वर मग्न आहे.
एकविसाव्या शतकात ज्ञान खूप आहे
आजच्या पिढीला मात्र ज्ञाना चा प्रकाश
देणारा ज्ञानोबा पाहिजे आहे,
आज मुल परदेशी जाऊन आई वडिलाना
विचारात नाही, का ?
शिकागोच्या धर्म परिषदेत माझ्या भारताच्या
संस्कृतीच तेजोमय निर्माण करणारा
आज विवेकानंद पाहिजे आहे,
आज ची तरुण पिढी Whats app वर मग्न आहे.

एकतेची - समतेची भावना निर्माण
होण्यासाठी गणेश उत्सव साजरे
करणारे लो. टिळक पाहिजे आहे,
रयते साठी , शेतकऱ्यांसाठी सतत
कार्यरत राहणारे राजे ! शिवाजी पाहिजे आहे,
आता देवी खूप झाल्या पण समाजाला पुण्य श्लोक
बहाल करणारी अहिल्या देवी पाहिजे आहे,
घरा घरात आया खूप झाल्या पण शिवाजी
जन्माला घालणारी आई पाहिजे आहे,
आज ची आई मात्र Whats app वर मग्न आहे.

गाड्या खूप झाल्या दळ्णवळनाचॆ साधणं
वाढली पण सामाज कल्याणासाठी भ्रमण
करणारा नामदेव पाहिजे आहे,
बागायतदार खूप झाले, पण कांदा - मुळा
भाजी अवघी विठाई माझी माऊली ,
म्हणणारा सावतामाळी पाहिजे आहे,
आज ची तरुण पिढी Whats app वर मग्न आहे.

तुकड्या तुकड्यात छोटसं जग
निर्माण होत आहे ,
समाजाला पूर्णत्व बहाल करणारा
संत तुकडोजी पाहिजे आहे,
पण आपण  Whats app वर मग्न आहे

मित्रांनो,
एक विनंती आहे ,
सुरुवात आपल्याला च करायची आहे,
मग का ? आपण सगळे Whats app वर मग्न आहे.
मग का ? आपण सगळे Whats app वर मग्न आहे.

वैभव गो. कुलकर्णी.
जालना.


kiran patil

अप्रतिम...
खरच आजच्या तरुन पीढीला या आपल्या सुसंस्कृत
काहीच घेण देण दिसत नाही ..फक्त शिव जंयतीला राजाची आठवन काढतात. फकत राजे जन्माला या अस बोलू काय फायदा पहिले मावळे व्हा

Vaibhav.kul

मित्रा किरण म्हणून तर म्हणालो आहे सुरूवात आपल्याला करायची आहे.

Shankar Poste


MK ADMIN