हिच ती माणसं ...

Started by Mayur Dhobale, February 17, 2016, 07:44:56 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

हिच ती माणसं ....

'नसलेला' तु,
असल्यागत मानून ,
असलेल्यांना हेटाळणारी...
हिच ती माणसं ....

मिरणारयां पुढ्यात मिरणारी,
श्रीमंतांच्या वरातीत नाचणारी...
पण  दिन-दुबळ्यांना कोलनारी...
हिच ती माणसं ....

छान गोड बोलणारी...
जमलच तर ,
एखादी कविता करणारी...
पण भाजीत मिठ नाही,
तर बायकोला 'झोडणारी'...
हिच ती माणसं ...

बहिणीचा मात्र आदर करणारी...
तिला फुलासारखे जपणारी...
परस्रीला मात्र  तिरक्या नजरेनं 'कोसणारी'...
हिच ती माणसं ....

मोठमोठी स्वप्न पाहणारी...
मोठमोठी ध्येये गाठणारी...
पण आई बापाला 'बाटणारी'...
हिच ती माणसं ...

तुला इत्तुश्या ,
दगडात मावणारी...
शेंदूर फासून पुजणारी...
मुक्या जनावराला मात्र ,
जिभेवर ठेवून 'चोखणारी'...
हिच ती माणसं ...

खरच सांगतो देवा...
'नसलेल्या' तुझाही..
वाटतोय मज हेवा...
कशी सहन करतोस बाबा,
'असलेली' हि माणसं....


           - मयुर  ढोबळे

https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/