*** अतुट विश्वास ***

Started by धनराज होवाळ, February 17, 2016, 10:38:24 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


💘 अतुट विश्वास 💘

प्रेमवाटेने जाता जाता,
तुझ्यावर जीव जडला..
तुझ्या त्या होकाराने,
हा एक प्रेमवीर घडला..!!

सुखी होता जोड आपला,
पण दृष्ठ लागली भाग्याला..
कुणीतरी येऊन तोडलं,
आपल्या अतूट धाग्याला..!!

सखे विरहाने तुझ्या फक्त,
जेव्हा हा प्रेमवेडा घडला..
माझ्या लेखनीचा हर शब्द,
तेव्हा मुक्यानेच रडला..!!

मुके झाले शब्द जरी,
भावना तल्लीन होत्या..
झाल्या कित्येक कविता,
तुला वाटायच्या खोट्या..!!

कविता लिहून तिजवर,
हा वेडा झाला मोठा कवी..
प्रेम समजले तिला जेव्हा,
हाती पडली तिच्या वही..!!

आली जीवनात परत माझ्या,
एका अतूट अशा विश्वासाने...
भूतकाळ सारा विसरुन मी,
जवळ केले तिला पुन्हा प्रेमाने...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
(धनराज होवाळ)
मो. ९९७०६७९९४९
❤❤❤❤❤❤❤❤❤