ती एक संध्याकाळ...

Started by Pravin Raghunath Kale, February 17, 2016, 11:38:26 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

ती एक संध्याकाळ...

ती एक संध्याकाळ...
तु, मी आणि फुलांचा मंद दरवळ
बोलत कोणीच नव्हते
जणू, शब्द नव्हते सोबत
फक्त, नजरेला भिडलेली नजर

ती एक संध्याकाळ...
अबोला होता त्याक्षणी
फक्त जवळीक वाढत होती
एकांत होता सारा
पण, मनात गोंधळ होता

ती एक संध्याकाळ...
जुळवून गेली नाते,
तुझ्या माझ्या
प्रीतीचे...

✒✒प्रविण रघुनाथ काळे
मो. 8308793007
Www.facebook.com/kalepravinr