माझा राजा...!

Started by Rajesh khakre, February 18, 2016, 09:45:50 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

झाले असतील कितीक राजे शिवबासारखा झाला नाही
गेली अनेक शतके उलटून हॄदयातून उतरला नाही

स्वराज्य निर्माता माझा राजा धर्माचा पालक खरा
धर्मविध्वसंक नराधमांना पाठविले ते यमसदना
भीती मनातील गनीमांच्या अजूनही कमी झाली नाही
झाले असतील कितीक राजे शिवबासारखा झाला नाही

तळपली तलवार जेव्हा उर शत्रुंचा चा कापून उठला
बलाढ्य अफजल खानाचा कोथळा बाहेर पडला
बोटे छाटता शाहिस्तेखान पुन्हा परत आलाच नाही
झाले असतील कितीक राजे शिवबासारखा झाला नाही

"स्वराज्य व्हावे ही श्री ची इच्छा" शिरसावंद्य मानली
निर्मिले स्वराज्य भूवरी जे दीपस्तंभ या जगी
मुजरा करण्या मान आमची तुमच्यासमोर नम्र होई
झाले असतील कितीक राजे शिवबासारखा झाला नाही
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

* कवितेखालील नाव काढून कविता फॉरवर्ड करु नये