तू होशिल का माझी?

Started by shailesh@26b, February 19, 2016, 01:53:14 AM

Previous topic - Next topic

shailesh@26b

ली भेट ही जरी आपली,तरी,
जुनीच आहे ओळख तुझी न माझी...

नजरभेटी कैकदा झाल्या चोरून चोरून
तेव्हापासुनची ओळख तुझी न माझी...

शब्दांत तुझ्या मी गुंततो वेड्यासारखा
अन् विसरतो ओळख तेव्हा मीच माझी...

रोज होऊनि अनोळखी,पुन्हा पुन्हा तुझ्यासाठी
नवा फुलावा रोज बहार हीच इच्छा माझी...

नजरभेट पुरे आता,ओळख होऊ दे काळजाची
सांग ना... मी तुझाच,पण तू होशिल का माझी?
✒शैलेश बोराटे
७७१८०८३३११