*** शिवभक्त ***

Started by धनराज होवाळ, February 19, 2016, 10:39:43 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


🚩🚩 शिवभक्त 🚩🚩

राजे...
भगवा घेऊनी हातात,
ज्याचं सळसळतं रक्त..
शपथ घेऊन सांगतो राजे,
तोच तुमचा खरा शिवभक्त..!!

राजे...
नुसतं नाव ऐकुनी तुमचं,
गर्वाने फुगते ज्याची छाती..
तोच पसरवतो सगळीकडे,
तुमच्या पराक्रमाची ख्याती..!!

राजे...
जो शिवभक्तीसाठी जगतो,
अन् शिवभक्तीसाठी मरतो..
तुमची भव्य मूर्ती पाहुन,
फक्त तोच मुजरा करतो..!!

राजे...
कसलाही भेदभाव न करता,
जो नेहमी शिवभक्तीत रमतो..
"जय शिवराय" बोलण्यास,
तो भक्त कधीच ना दमतो..!!

राजे...
शिवभक्ताची ही जात हाय,
मोडेल पण वाकणार नाय..
राजेंशिवाय इतरांपुढे हात,
जोडेल पण झुकणार नाय..!!

राजे...
कर्तव्य असे की उरावी किर्ती,
हृदयात ज्याच्या वसे तुमची मुर्ती...
छाती जरी कठीण, काळीज ना सक्त...
राजे फक्त तोच खरा शिवभक्त...!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा..
🙏🏻🙏🏻🚩⛳🚩🙏🏻🙏🏻
जय शिवराय...
   जय भिमराय...
-
एक कट्टर शिवभक्त,
👼 धनराज होवाळ 👼🏼
मो. ९९७०६७९९४९
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩