सुंदर स्वप्न

Started by Minakshi Pawar, February 19, 2016, 09:33:25 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

                       सुंदर स्वप्न

स्वप्नात आला एक राजकुमार
कळलं नाही आता काय होणार,

तो म्हणाला प्रिये मी तुझ्यासाठी आलो
बागेत तुला बघितलं नी तुझाच होउन बसलो

तो आला होता पांढऱ्या घोड्यावर
माझे मन भाळून गेले त्याच्यावर,

तो म्हणाला तू आहेस माझी राणी
दोघे मिळून लिहू आयुष्याची कहाणी,

मी नकळतचं हो म्हणून बसले
आणि  अलगद हृदय देऊन बसले,

सकाळ झाली स्वप्न संपले
मन माञ त्यातच गुंतले.

                 कु. अंजली मोहनराव पवार
                pawaranjali416@gmail.com

milinddamodare