शोध

Started by शिवाजी सांगळे, February 19, 2016, 10:35:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शोध...

विखुरलेली शोधतांना नाती
स्वतःलाच हरवू लागलो,
जोडतांना बंध विश्वासाचे
शृंखलेतुन निखळुन गेलो !

मोह कसला स्थावराचा
मर्त्य मानवास ह्या होतो,
अंती उरतात भग्न अस्थी
प्रवासी दिगंताचा होतो !

शुध्दतेच्या स्मृती माघारी
भविष्याच्या मार्गा साठी,
ओलावतील अश्रुपुष्पांनी
मांडलेले पिंड पुजेसाठी !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९