वावटळ ……. !!!

Started by samudra, February 20, 2016, 01:30:55 PM

Previous topic - Next topic

samudra

मनात माझ्या उठले वादळ ,
वादळ म्हणावे कि वावटळ ???
जीवाची होतेय घालमेल ,
कशाचाच नाही कशाला मेळ ...

काळीज खातेय हेलकावे ,
भावनांचा होतोय लपंडाव ...
प्रयत्नांची करून पराकाष्ठा ,
भविष्याचा घेतोय ठाव ...

नाही पाऊस नाही पाणी ,
डोळे मात्र ओलेचिंब ...
निसर्गाने फिरवली पाठ,
फक्त मृगजळात दिसते प्रतिबिंब...

आता नाही भरवसा जीवनाचा,
संपव हा खेळ उन पावसाचा ...
फुटूदे पाझर तुझ्या आसमंतास,
तृप्त होउदे धरणी हीच आम्हा आस....