रंग गुलाबी कधी मिसळला?

Started by akshayenam, February 21, 2016, 01:02:38 PM

Previous topic - Next topic

akshayenam

कधी अक्षयचा मी अकश्या झालो
कधी माकड कधी बोकड झालो।
कुटेतरी शब्दांच्या या खेळामधे
स्वताला हरवताना पाहत गेलो।। 

कधी मस्करित तुझे पाय खेचले
कधी हसवले तर कधी रडवले।         
न जाने पोर्निमेला विसवालेले     
हे चन्द्र चांदने कुणी वेचले।।

भरतीची वेडी लाट धावली
किनार्याला फक्त स्पर्शुन गेली। 
आयुष्यभराची साथ अपेक्षली
पण ती लाट बनुनी हरवून गेली।।     
                   
  मैत्रिच्या त्या धुंद तूफान वेळी       
फुलांचा सडा तो हवेत पसरला।     
न जाने निरागस मैत्रीत माज्या     
हा रंग गुलाबी कधी मिसळला।।

अक्षय