लाज

Started by dhanaji, February 22, 2016, 11:47:20 AM

Previous topic - Next topic

dhanaji


गर्द अंधारात एका किरणाने
लख्ख चमकून जावा सुरा
तशी वासना तरळते त्याच्या डोळ्यांत
ताठरलेल्या शरीरात..


क्षणभरच...
मानव्याचे पापुद्रे गळून
भयाण आदिम चेहरा
नागडे दात दाखवत
लाळ गाळताना दिसतो


स्वतःला आटोकाट काबूत ठेवून
सैल होत
तो आपल्या दिनमानात बुडूनही जातो
पण मी...
अवचित उफाळून आलेल्या
जनावराची छबी
विसरता विसरु शकत नाही


आरशाला भिडायची लाज वाटते
पुढचे काही दिवस !!


-- अमेय पंडित