रंग वेगळा

Started by dhanaji, February 22, 2016, 11:51:24 AM

Previous topic - Next topic

dhanaji


रंगात रंगले मी
तू कोरडा असा का
मी चिंब धुंद झाले
नवखा अजुनी तू का


मी विसरले स्वतःला
रंग वेगळा
तू चुम्बलेस जेंव्हा
लज्जेत चूर झाले
वर पाहिले न तेंव्हा


कण एक एक माझा
इष्कात बुडुनी गेला
देहाशी खेळताना
विसरुनी भान गेला


फिरवूनी पाठ तरीही
झोपेत लीन होता
हे शोभते तुम्हा का
करू काय मीही आता


शृंगार हा तुझा रे
अळणी जरी हि झाला
विसरू कशी तुला मी
जीव एकरूप झाला


प्रिन. राम म्हात्रे