सोबत

Started by dhanaji, February 22, 2016, 11:52:05 AM

Previous topic - Next topic

dhanaji


तुझ अस सारख तळ्यात
मळ्यात करण ......
ठाव लागतच नाही मनाचा
तुला नक्की काय हवय?
कधी कधी वाटत
तुला खरच नक्की कळत नाही
की कळत पण वळत नाही ?
मी पहात राहते तुझी
दमछाक त्रयस्थपणे.........
तुझ्या मनाची आंदोलन ......
पण सामील नाही होऊ
शकत ना ............
म्हणून मग काठावर उभी
राहून सोबत करते तुला
तुझ्याही नकळत........
तुझ्यासाठी नाही रे
माझ्यासाठी .........
मला मानसिक समाधान की
तुझा निर्णय कुठलाही
ठरला तरी मी आहेच
रे तुझ्या सोबत
नेहमीसारखीच ............


सौ ज्योत्स्ना राजपूत