चौकट

Started by dhanaji, February 22, 2016, 11:52:42 AM

Previous topic - Next topic

dhanaji


मला कळायला लागल ना !
तेव्हापासून एक चौकट सजवून ठेवली होती
मनाच्या गाभा-यात ..........
की आपल्या हसण्यानी ,रुसण्यानी.
असण्यानी , नसण्यानी ज्याला
खरच फरक पडेल ,आपण न बोलताही
आपल मन कळेल ,
ज्याच पाऊल आपण न बोलवताही आपल्या
घराकडे वळेल
त्याचाच फोटो लावायचा या चौकटीत .......
आयुष्याची संध्याकाळ जवळ आली
तरी चौकट रिकामीच होती रे ...........
अन अचानक त्या संध्याकाळची सुंदर पहाट
कशी झाली .........हे कळलच नाही ............
खूप काही करावस, आयुष्य ओंजळीत भरावस
फुलांकडे पाहून हसावस वाटू लागल ........
अन एक दिवस त्या चौकटीची आठवण झाली
लगेच मनाच्या गाभा-यात डोकावून पाहिलं
तर चौकटीत चक्क तुझा फोटो होता .......
आणि तुला म्हणून सांगते रे ssss
जी चौकट मी जपून ठेवली होती ना आयुष्यभर
ती अगदी अस्पष्ट दिसत होती.............
स्पष्ट दिसत होता तो फक्त तुझा
हसरा चेहरा .....................


सौ ज्योत्स्ना राजपूत