विटाळ होतो स्त्रीत्वाचा

Started by dhanaji, February 22, 2016, 11:57:01 AM

Previous topic - Next topic

dhanaji




विटाळ होतो स्त्रीत्वाचा हो ज्या देवाला
स्वत:च त्याने घालावे मग मुल जन्माला


अभिषेकाची धार तुझ्यावर दगड तरी 'तू' !
शिंतोड्यांनी फुटे पालवी भिंताडाला ..


मनी कुणाच्या नकोच आता जागा मजला
मीच शोधले आहे माझ्या अढळ ध्रुवाला


अहंकार अन मत्सर म्हणजे तुझे सोयरे
किती त-हेने सजवतात अपुल्या नात्याला


शोध अता तू हात नवा मुरगळण्यासाठी
धार कट्यारीची आली माझ्या हाताला


वेशीवरती धरे, तुझी लक्तरे टांगतो
नको भुलू तू पाउस म्हणणा-या पुरुषाला


जहाल काही लिहून जाशिल आणिक 'प्राजू'
धर्मांधांची फौजच येईल बघ मोर्चाला


Prajakta Patwardhan‎