मन घायाळ माझे!!

Started by श्री. प्रकाश साळवी, February 22, 2016, 04:17:57 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

मन घायाळ माझे...!
नको ऊगा दिलासा, मन घायाळ माझे
तुझी याद करते, मन हे ओढाळ माझे
खुणवितात स्वप्ने माझी तोंड वेंगाडूनी
लाडात टर ऊडविते मन खट्याळ माझे
राहिलो मी पहात तुझ्या पाठमो-या आकृतिला
ऊगा राहिले बडवित मन कपाळ माझे
होते कोरिले शिल्प मी हृदयात माझ्या
गोंजारीत राहिल्या आठवणी मन लडिवाळ माझे
कसे समजाऊ या "वेड्या" मनाला
व्यर्थ काही बडबडे मन वाचाळ माझे
जरी तोडली बंधने या घडीला
राहील आठवित प्रेम आपुले मन चिरकाल माझे

श्री.प्रकाश साळवी