दूःख!!

Started by श्री. प्रकाश साळवी, February 22, 2016, 05:10:13 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

दूःख !!
दूःख काय असत
ते खरं तर ज्याच्या
पाचविला पूजलेलं
असतं, त्यालाच
चांगलं माहित असत.
अंतरंगाच्या कोप-यात
दडलेलं, वेदनांनी कळवळणारं
पण तोंडावर हसू कायमचे
दू:खाला देतात नशेच्या स्वाधिन
आणि गिळून टाकतात दूःखाला
दूःख ! कोणाला चुकलय?
गरीबाला दूःख, श्रीमंताला दूःख
दूःखिताला दूःख, आनंदाला दूःख
कोणालाच चुकलं नाही
सुखाचं जुळं भावंड
दूःख!